घटना-घडामोडी

मराठी संशोधन मंडळाची ज्ञानगंगा

महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात संशोधनाच्या पातळीवर मुलगामी मोलाची भर घालणार्‍या मान्यवर साहित्यविषयक संस्थांमध्ये ‘मराठी संशोधन मंडळा’चे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

विख्यात साहित्यिकांच्या हस्ताक्षर जतनाकडे दुर्लक्ष का?

इंग्लंडमध्ये नाटककार शेक्सपिअरच्या हस्ताक्षराचे जतन होऊ शकते, तर मग गो. ना. दातार, नाथमाधव अशा विख्यात कादंबरीकारांचे हस्ताक्षर महाराष्ट्रात जतन का होऊ शकत नाही? नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचा सवाल. शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणार्‍या मराठी संशोधन मंडळाच्या ‘संशोधन पत्रिके’चे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

मराठी संशोधन मंडळाचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या शतसंवत्सरिक पुण्यतिथीनिमित्त प्रा. अ. का. प्रियोळकर यांनी मराठी संशोधन मंडळाची संकल्पना मांडली.

मराठी संशोधन मंडळाची
पाऊण शतकी वाटचाल

मराठी संशोधन मंडळ ही संस्था मुंबईत १ फेब्रुवारी १९४८ रोजी सी.डी.देशमुख यांच्याप्रेरणेने सुरू झाली. २०२२-२०२३ हे वर्ष मंडळाचेअमृतमहोत्सवी वर्ष आहे. मंडळाच्या एकूण ७५ वर्षांची वाटचाल जाणून घ्यायचीआहे.

अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना मराठी संशोधन मंडळ 1 फेब्रुवारी 2022 रोजी 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त मंडळाचे संचालक डॉ. प्रदीप कर्णिक यांनी मंडळाच्या वाटचालीविषयी दिलेली माहिती…

मंडळाच्या वेबसाईटचं आणि अमृतमहोत्सवी विशेषांकाचं प्रकाशन

कर्तव्य साधना मराठी वाङमय आणि भाषा यांवर संशोधन व्हावं या उद्देशानं 1 फेब्रुवारी 1948 रोजी मुंबई मराठी संशोधन मंडळ या संस्थेची स्थापना झाली. नावाप्रमाणं संस्थेनं अगदी सुरूवातीपासूनच मराठी वाङमयीन संशोधनात स्वत:ला वाहून घेतलं. प्रारंभीच्या काळात भारतरत्न पां. वा. काणे, प्रा. कृ. पां. कुळकर्णी, प्रा. अ. का. प्रियोळकर, बाळासाहेब खेर अशी दिग्गज मंडळी संस्थेच्या कार्यकारणीत होती. …

मंडळाच्या वेबसाईटचं आणि अमृतमहोत्सवी विशेषांकाचं प्रकाशन Read More »