कोशवाङ्मय
मंडळाच्या उद्दिष्टांमध्येच कोशवाङ्मयाच्या निर्मितीचे धोरण दृष्टीसमोर ठेवण्यात आले होते. त्याला अनुसरून संस्थेने पुढील कोशांची निर्मिती केली.
- शब्दकोश
- ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार – रा. ना. वेलिंगकर – ज्ञानेश्वरी, राजवाडे प्रतीच्या आधारावर तयार केलेला शब्दकोश / पदकोश. डबल क्राऊन आकाराची ४९६ पृष्ठे आणि पृष्ठांची परिशिष्टे. या ग्रंथांसाठी महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठाचे अर्थसहाय्य लाभले होते.
- आ. ज्ञानेश्वरीतील शब्दांचा कोंकणी बोलीत शोध – कै. आनंद रामकृष्ण नाडकर्णी – ज्ञानेश्वरीत येणार्या, पण आजच्या ग्रांथिक मराठीत लुप्त झालेल्या कोंकणी बोलीतील शब्दांचा कोश. सदर कोशातील अर्थाद्वारे ज्ञानेश्वरीचा वेगळा अर्थ समोर येऊ शकतो.
- पदकोश
- अनुभवामृताचा पदसंदर्भ कोश – शरद केशव साठे : मूळ ग्रंथातील शब्दाचे स्थान, आणि त्या शब्दाचा समावेश असणारे चरण, यांची आकारविल्हे लावलेली शब्दसूची असे त्याचे स्वरूप. शब्दाच्या अर्थांचा समावेश नाही.
- तुकाराम पदकोश – मंडळातील अनेक संशोधक सहाय्यकांनी तयार केलेली निर्मिती. तुकाराम गाथेतील प्रत्येक शब्दाचे मूळ ग्रंथातील केवळ स्थान देणारा कोश. चरणांचा व शब्दाच्या अर्थांचा समावेश नाही. शरद केशव साठे यांनी तपासून, हस्तलिखित प्रत तयार केली. कोश प्रकाशित झाला नसून, हस्तलिखित प्रत राज्य मराठी विकास संस्थेकडे आहे.
- श्रीनिवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि चांगदेव महाराज यांच्या अभंगातील शब्द व चरणसूची- शरद केशव साठे.
- श्रीज्ञानदेव समकालीन चार संतांच्या अभंगातील शब्दांचा व त्या शब्दांचा समावेश असणार्या चरणांचे मूळ ग्रंथातील स्थान दर्शविणारा पदकोश. शब्दांचे अर्थ दिलेले नाहीत.
- वाङ्मयीन चरित्रकोश
- मराठी वाङ्मयीन कोश – खंड १ ते ४
- मराठी संशोधन मंडळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
- १९६८ साली कार्यास प्रारंभ
- आराखडा मान्यवर अभ्यासकांना पाठविण्यात आला.
- संपादक मंडळ
- १९६८ ते १९८२ – श्री. गं. दे. खानोलकर, प्रा. रा. भि. जोशी
- १९६८ ते १९७१ – प्रा. वा. ल. कुलकर्णी, डॉ. स. गं. मालशे
- स्वरूप
- खंड १ला – इ. स. ११८८ ते १८५८ काळातील मराठी ग्रंथकार
- खंड २रा – १८५८ ते १९७३ या काळातील ग्रंथकार
- खंड ३रा – ११८८ ते १९७३ या काळातील महत्त्वाच्या ग्रंथांचा परिचय
- खंड ४था – साहित्य प्रकार, संप्रदाय, समीक्षा, परिभाषा, संज्ञा यांचा परिचय
- प्रमुख संपादक
- खंड १ ते ३ – गं. दे. खानोलकर
- खंड ४ – प्रा. म. वा. धोंड
- अनुदान – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
- आकार – डबल क्राऊन, पृष्ठे : ६००
- प्रकाशन – प्रथम खंड १९७७ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित
- कार्य स्थगित – १९८२ मध्ये साहित्य आणि संस्कृती मंडळाने संपूर्ण प्रकल्पाचे कार्य आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतल्याने प्रकल्प स्थगीत.
- मराठी वाङ्मयीन कोश – खंड १ ते ४