मंडळाने प्रामुख्याने कोश, सूची साधननिर्मितीचे प्रकल्प अथवा संहिता संपादन, पाठभेदांसह चिकित्सक आवृत्ती तयार करणे किंवा असंग्रहित, अप्रकाशित साहित्याचे संकलन, संपादनाचे कार्य अंगीकारणे अशी संशोधनपद कार्ये अंगावर घेऊन ती पूर्णत्वास नेली आहेत.
मंडळाचे पूर्ण झालेले संशोधन प्रकल्प / संशोधन कार्ये
- महाराष्ट्राचे भाषा व्याकरण
- लेखक : जगन्नाथशास्त्री क्रमवंत, गंगाधरशास्त्री फडके, बाळशास्त्री घगवे.
- संशोधक-संपादक : प्रा. अ. का. प्रियोळकर
- स्वरूप : १९५० साली ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’तील मराठी हस्तलिखितांचा कॅटलॉग प्रकाशित झाला, तो वाचीत असताना प्रा. प्रियोळकरांना या पहिल्या, अप्रकाशित आणि अज्ञात मराठी व्याकरणाचा शोध लागला. इंग्लंडवरून त्यांनी त्याची ‘मायक्रो फिल्म’ मागविली व हा ग्रंथ सिद्ध केला.
- कालावधी : १९५०-१९५४
- प्रकाशन : मंडळातर्फे प्रकाशित (१९५४)
- मुक्तेश्वरकृत महाभारत – आदिपर्व : खंड १ ते ४
- संशोधक-संपादक : प्रा. अ. का. प्रियोळकर
- संशोधन कालावधी : १९५१ ते १९५९
- स्वरूप : प्रातिनिधिक व कालनिर्दिष्ट अशा ११ आधार हस्तलिखितांवरून संहिता निश्चिती. यातील दुसरा खंड १९५४-५५ मध्ये मुंबई आणि कर्नाटक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट. १९५४च्या पुणे विद्यापीठाच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमातही दुसर्या खंडाचा समावेश.
- प्रकाशन : ग्रंथरूपाने मंडळातर्फे प्रकाशित.
- कविवर्य मोरोपंतांची स्फुटकाव्ये – खंड १ ते ३
- संपादक : प्रा. अ. का. प्रियोळकर
- सहसंपादक : बाळाचार्य खुपेरकर आणि दा. वि. जोशी
- संशोधन कालावधी : १९६१ ते १९६४
- स्वरूप : मोरोपंतांच्या मूळ हस्तलिखित पोथ्यांवरून संहितेची निर्मिती
- प्रकाशन : ग्रंथस्वरूपाने मंडळातर्फे प्रकाशित.
- गोविंद नारायण माडगावकर संकलित वाङ्मय – खंड १ ते ४ (खंड ४ अप्रकाशित)
- संपादक
- खंड १ – प्रा. अ. का. प्रियोळकर / डॉ. स. गं. मालशे
- खंड २ – डॉ. स. गं. मालशे / प्रा. अ. का. प्रियोळकर
- खंड ३ – डॉ. स. गं. मालशे / डॉ. सु. रा. चुनेकर
- कालावधी : १९६७-१९७०
- स्वरूप : माडगावकरांच्या दुर्मीळ साहित्याचे संकलन-संपादन
- प्रकाशन : ग्रंथस्वरूपाने मंडळातर्फे प्रकाशित
- संपादक
- The Printing Press in India – Its Beginning and Early Development
- संशोधक-लेखक : प्रा. अ. का. प्रियोळकर
- कालावधी : १९५३-१९५८
- स्वरूप : भारतात मुद्रणाचा प्रवेश झाल्यापासूनचा आणि प्रवेशामुळे झालेल्या वाङ्मयीन-सांस्कृतिक-सामाजिक बदलांचा घेतलेला शोध. मुद्रणकलेच्या प्रारंभापासूनचा तांत्रिक विकास – इतिहास. विकासाला सहाय्यभूत ठरलेल्या व्यक्ती, संस्था, घटनांचा शोध व कार्य. माननीय राजगोपालाचारी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. सुनीतिकुमार चॅटर्जी इत्यादींनी गौरविलेला संशोधनपर ग्रंथ
- प्रकाशन : मंडळातर्फे ग्रंथरूपाने प्रकाशित (१९५८)
- बाळकृष्ण अनंत भिडे लेखसंग्रह – खंड १ व २
- संपादक-संशोधक : डॉ. सु. रा. चुनेकर
- स्वरूप : विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांतील प्रमुख साहित्य-विमर्शक, समीक्षक, संपादक, कवी बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या समग्र स्फुट लेखांचा संग्रह
- प्रकाशन : मंडळातर्फे ग्रंथरूपाने प्रकाशित (२०२१)
- शेतकर्याचा आसूड
- लेखक : महात्मा ज्योतिबा फुले
- संशोधक-संपादक : धनंजय कीर, डॉ. स. गं. मालशे
- स्वरूप : म. ज्योतिबा फुले यांचा प्रख्यात ग्रंथ ‘शेतकर्याचा आसूड’ अप्रकाशित होता. त्याची हस्तलिखित प्रत कलकत्त्याच्या नॅशनल लायब्ररीत होती. ती धनंजय कीरांनी मिळवली आणि मराठी संशोधन मंडळाने या ऐतिहासिक अप्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन केले.
- प्रकाशन : मंडळातर्फे प्रथम आवृत्ती प्रकाशित (१९६७)
- डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे वाङ्मयविषयक लेख
- संशोधक-संपादक : गं. दे. खानोलकर
- स्वरूप : डॉ. केतकर यांच्या दुर्मीळ व असंग्रहित वाङ्मयीन लेखांचे सटीप संपादन
- कालावधी : १९६९-१९७४
- प्रकाशन : मंडळातर्फे ग्रंथरूपाने प्रकाशित (१९७४)
- मराठी भाषेचे मूळ
- संशोधक-लेखक : विश्वनाथ खैरे
- स्वरूप : संस्कृत-मराठी-तमिळ (संमत) असा मराठी भाषेचा प्रवास मांडणारे मूलभूत भाषिक संशोधन
- प्रकाशन : प्रथम आवृत्ती मंडळातर्फे प्रकाशित (१९७९)
- प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या डायर्यांतील टिपणे – भाग १
- संशोधक-संपादक : प्रा. रमेश तेंडुलकर (ग्रंथावर प्रस्तुत नामनिर्देश नाही)
- कालावधी : १९८४-१९८७
- स्वरूप : एकोणिसाव्या शतकातील काही प्रमुख वाङ्मयीन नियतकालिकांचा अभ्यास व संशोधन करताना स्वतःकरिता खास डायरीत लिहून काढलेल्या टिपणांचा मूळ लिखित स्वरूपातला संग्रह
- प्रकाशन : ग्रंथरूपाने मंडळातर्फे प्रकाशित (१९८७). पुढील भाग अप्रकाशित
- हिंदुस्थानातील मुद्रण : प्रारंभ आणि विकास
- मूळ लेखक : प्रा. अ. का. प्रियोळकर
- अनुवादक : श्रीमती सुधा भट
- मूळ ग्रंथ : The Printing Press in India – Its Beginning and Early Development या ग्रंथाचा मराठी अनुवाद
- कालावधी : २०१५-२०१८
- स्वरूप : हिंदुस्थानातील मुद्रण प्रारंभाचा आणि त्या कलेच्या विकासाचा इतिहास. मुद्रणामुळे झालेला सामाजिक-सांस्कृतिक-वाङ्मयीन कायापालट. व्यक्ती, संस्था, घटनांचा मूलभूत शोध
- प्रकाशन : मंडळातर्फे प्रकाशित (२०१८)