उद्दिष्टे व कार्य

संस्थेची उद्दिष्टे

  • मराठी भाषा, वाङ्‍मय व तद्‌नुषंगिक विषय यासंबंधी संशोधन कारणे व संशोधनास सहाय्य करणे
  • प्राचीन मराठी ग्रंथांच्या चिकित्सक पद्धतीवर आधारलेल्या आवृत्त्या काढणे
  • हिंदुस्थानात व इतरत्र संग्रहात असलेल्या प्राचीन मराठी हस्तलिखित ग्रंथांची बृहन्नामावली तयार करणे
  • प्राचीन व महत्त्वाच्या ग्रंथांची हस्तलिखिते व पोथ्या वगैरे मिळविणे. ती हस्तलिखिते मिळाली नाहीत तर त्यांचे प्रतिलेख काढणे
  • प्राचीन व मध्यकालीन शिलालेख, ताम्रपट यांच्या प्रतिकृती तयार करून त्या प्रकाशनासाठी सिद्ध करणे व त्यांचे प्रकाशन करणे
  • सेंट पिटर्सबर्ग कोश किंवा ऑक्सफर्ड इंग्रजी कोश यांच्या पद्धतीवर मराठी भाषेचा संपूर्ण कोश तयार करणे
  • कार्यकारी समितीच्या विचारे संशोधनाची जी इतर कामे वेळोवेळी ठरतील ती व व संशोधनास उपयुक्त अशी अन्य कामे करणे
  • एम. ए. व पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना व इतर संशोधनेच्छु अभ्यासकांना संशोधनाच्या बाबतीत मार्गदर्शन करणे

मराठी संशोधन मंडळाचे कार्य

  • संशोधन प्रकल्प
  • संशोधन साधने
  • प्रकाशने – ग्रंथप्रकाशन / पुस्तिका
  • नियतकालिक प्रकाशन (त्रैमासिक)
  • हस्तलिखितांचा संग्रह / सूक्ष्मपटांचा संग्रह
  • शैक्षणिक कार्य
  • पदव्युत्तर संशोधन केंद्र
  • शैक्षणिक उपक्रम
  • कार्यक्रम
  • ग्रंथालय