मराठी संशोधन मंडळाची स्थापना १९४८ साली झाली. आम्ही ‘मराठी संशोधन पत्रिका’ नावाचे संशोधनास वाहिलेले त्रैमासिक ६८ वर्षांपासून नियमित प्रकाशित करीत आहोत. १५० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. एम. ए. (मराठी), पीएच्. डी. (मराठी) साठी संशोधन करू शकणारे संशोधक मंडळातर्फे मुंबई विद्यापीठात नोंदणी करू शकतात. मंडळाच्या अधिक सविस्तर कार्याविषयी जाणून घेण्यासाठी ह्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
- स्थापना : १ फेब्रुवारी १९४८
- संस्थापक : प्रा. अ. का. प्रियोळकर
- प्रेरक : सर चिंतामणराव देशमुख
- पालक संस्था : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई
- नोंदणी क्रमांक : E3625(BOM) 23/11/1967